Anil Awachat (अनिल अवचट)

November 18, 2018

अनिल अवचट ह्यांच्या अनुभव २०१८ दिवाळी अंकातील ‘गुणगुणसेन’ या लेखातून

उस्ताद अमीर ख़ाँ असेच संगीत हाच प्राण असलेले आणि त्यातच देहभान हरपून गेलेले कलावंत. ‘गुणगुणसेन’ ह्या लेखात अनिल अवचटांनी त्यांच्या अशाच काही आठवणी सांगितल्या आहेत – एकदा सरोदवादक अमजद अलींबरोबर प्रेक्षागृहात मध्यरात्र होईपर्यंत दंग होऊन एकटेच गात होते, कोणीही प्रेक्षक नसल्याचे त्यांच्या लक्षातही आले नाही. हे ते दोन किस्से –

amir-khan-1

amir-khan-2

शेवटी उस्ताद अमीर ख़ाँच्या गाण्याविषयी, भीमसेन जोशींच्या उधृतासकट –

amir-khan-3

अनुभवच्या अंकाविषयी मी दुसर्‍या ब्लॉगवर एक वेगळा लेख लिहिला आहे, तो इथे वाचता येईल – कसे हरपते असे देहभान?

March 24, 2017

पुढे जाण्यासाठी मागे वळून पाहताना 15 Jan 2017

१५ जानेवारीला पुण्यात, बालगंधर्वला डॉ. आनंद नाडकर्णी, डॉ. अनिल अवचट आणि डॉ. अभय बंग या तिघांची एकत्र मुलाखत विवेक सावंत ह्यांनी घेतली. त्या तिघांशीही मो़कळ्या गप्पा झाल्या आणि त्याच्या कामांमागील प्रेरणांची उलगडा झाला. आनंद नाडकर्णी यांनी अवचटांची कामाची introvert पद्धत आणि अभय बंगांची कामाची extrovert पद्धत फार छान उलगडून सांगितली. अभय बंगांचे हे विचार फार महत्वाचे, दिशादर्शक वाटतात  –

आपल्या गरजा कमी ठेवल्या की आपल्याला मनासारखे काम करायचे स्वातंत्र्य मिळते. पैशासाठी ऊर फुटेस्तोवर काम करायची गरज राहत नाही.

– डॉ. अभय बंग

ह्या मुलाखतीचे संपुर्ण रेकॉर्डींग यू ट्यूबवर उपलब्ध आहे, तेच इथेही दिले आहे – अवश्य पहा!

July 8, 2016

संभ्रम आणि धार्मिक या त्यांच्या पुस्तकांबद्दल बोलताना अनिल अवचट

स्वतः अनिल अवचट त्यांच्या “संभ्रम” आणि “धार्मिक” या पुस्तकांबद्दल बोलतात आहे, जरूर बघा –

October 30, 2014

पुस्तक रसग्रहण : माझी चित्तरकथा (ऋजुता घाटे)

माझी चित्तरकथा - अनिल अवचट

माझी चित्तरकथा – अनिल अवचट

वाचकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण करणारी, विचार करायला लावणारी, अस्वस्थ व्हायला लावणारी; सामाजिक प्रश्नांवरील अनेक अभ्यासपूर्ण पुस्तकं अनिल अवचट यांनी लिहिलेली आहेत. एक संवेदनशील मन असलेला माणूस हे सर्व लोकांपुढे यावं, त्यांनाही तळागाळातील माणसांचं जगणं कळावं यासाठी हे लेखन करतो आणि पुस्तकांच्या रुपात ते वाचकांसमोर ठेवतो; हे प्रश्न जाणून घेणारा त्याबद्दल लिहिणारा हा लेखक मन शांत कसं ठेवत असेल बरं?

या प्रश्नाचे उत्तर अनिल अवचट यांच्या ‘माझी चित्तरकथा’ या समकालीन प्रकाशनाने काढलेल्या पुस्तकात मिळेल. अनिल अवचट यांच्या शब्दात सांगायचं झालं तर ते म्हणतात, आनंदासाठी चित्रं काढायचा विरंगुळा शोधलेला मी माणूस आहे. या पुस्तकातील चित्रं पाहून तुमच्यातली चित्रं काढायची उर्मी जागी झाली आणि तुम्हीही चित्रं काढू लागलात तर बहार येईल.

सामाजिक प्रश्नांवर लिहिणार्‍या अनिल अवचट या वल्ली माणसाला ओरिगामी, स्वयंपाक, गायन, बासरीवादन, दोर्‍याचे आणि नाण्यांचे खेळ, लाकडातून शिल्प तयार करणे, चित्रं काढणे असे अनेक छंद आहेत. त्या सर्वांबद्दल ‘छंदांविषयी’ या पुस्तकामधे त्यांनी पुर्वी लिहिलेलं आहे. पण ‘माझी चित्तरकथा’ या पुस्तकात अनिल अवचट यांच्या चित्रांचा प्रवास कसा झाला याबद्दल त्यांनी सांगितले आहे.

लहानपणी सगळ्यांना चित्रं काढायची आवड असते. पण मोठं झालं की सगळेच ही आवड पुढे चालू ठेवतात असं नाही. पण अनिल अवचट यांनी ही आवड पुढे जोपासली. मोर, हत्ती, दगड, डोंगर, झाडं, माणसं यांची भरपूर चित्रं काढली. स्केचपेन, बाॅल पाॅइंट पेन, मार्कर्स, ‘एच’, ‘बी’चे सुईसारखे शिसं असणार्‍या क्लच पेन्सिल्स… ऑइल पेस्टल, साॅफ्ट ड्राय पेस्टल अशी अनेक माध्यमं वापरुन सातत्याने प्रयोग करत मनापासून आनंद घेत चित्रं काढली.

पुस्तकाच्या मुखपृष्ठावरील मोर लक्ष वेधून घेतो. त्याचा पिसारा फुललाय की कुण्या झाडाची पानं पसरलीत ही? अशीच सहज सोप्या रेषेतून उमटलेली भरपूर चित्रं या पुस्तकात आहेत. एकमेकांशी गप्पा मारणारी एकमेकांना बिलगून बसलेली मायाळू माणसं, आदिमानवाच्या गुहेतील चित्रांची आठवण होईल अशी नाजूक रेषांतील माणसं , पाना फुलांसारखीच एकमेकांत गुंतून गेलेली युगुलचित्रं … जाड मार्करच्या रेषांनी वेगवेगळे भाव दाखवणारे चेहरे, शिल्प आहेत असा भास होणारे एकमेकांना जोडलेले बारिक टोकाच्या पेनने शेडिंग केलेले चेहरे. डोंगरातून फिरणारे हत्ती, पानांच्या पसार्‍याचाच पिसारा झालेले मोर… आणि खूप झाडं…. आभाळ व्यापून टाकलेली, घनदाट जंगलातील, गार गार सावली देणारी झाडं.. धुक्यात हरवलेली काहीशी गूढ वाटणारी क्लच पेन्सिलने शेडिंग केलेली झाडं… डोंगर. .. म्हातारबाबा … ऑइल पेस्टलमधे केलेली काहीशी अमुर्त वाटणारी मनाला नवी उमेद देणारी चित्रं… अनेक चित्रं या पुस्तकात आहेत.

गुळगुळीत आर्ट पेपरवरील रंगीत छपाई असल्याने ही सर्व चित्रं प्रत्यक्ष जशी असतील तशीच पाहाण्याचा आनंद मिळतो. पृष्ठांचा फिकट रंग आणि त्यावर फिकट रंगात केलेला चित्ररेषांचाच वापर यामुळे चित्रांच्या आणि मजकुराच्या मांडणीलाही उठाव आला आहे. पुस्तकाचं स्वरुप देखणं झालं आहे.

अनिल अवचट यांनी त्यांच्या चित्रांचं कधी मोठ्या गॅलरीत प्रदर्शन भरवलं नाही. हे पुस्तक म्हणजे या सुंदर चित्रांच्या प्रदर्शनाचं एक छोटसं दालनच आहे. जिथे अनिल अवचट यांची सर्व चित्रं एकत्र पाहण्याचा आनंद तर मिळतोच, शिवाय या ‘वल्ली’ माणसानं त्या चित्रांसारख्याच सहज सोप्या शब्दांत गप्पा मारता मारता सांगितलेल्या काही गहन गोष्टीही मनाला भावतात.

अनिल अवचट यांच्या रेषा ते वळवतील तशा वळतात की रेषाच्या मनाप्रमाणे अनिल अवचट यांच्याकडून चित्र उमटत जातं? ही सर्व चित्रं निसर्गाच्या जवळची…. माणसामाणसांतल्या आदीम निरागस नात्याची …. स्वतःच्या आनंदासाठी काढलेली दुसर्‍यांना आनंद आणि चित्रं काढण्याची उर्मी देणारी अशी ही चित्रं. या चित्रांतून सहजता जाणवते , या चित्रांशी जवळीक निर्माण होते. आणि ती चित्रं अनिल अवचट यांची न राहता आपली सर्वांची होऊन जातात!

माझी चित्तरकथा 
लेखक: अनिल अवचट
प्रकाशकः समकालीन प्रकाशन

माझी चित्तरकथा: ऋजुता घाटे

October 16, 2014

२०१४ दिवाळी अंकातील अनिल अवचट ह्यांचे लेख

या वर्षीच्या (२०१४) दिवाळी अंकातील अनिल अवचट ह्यांचे लेख –

  1. साप्ताहिक सकाळ – तुकोबा
  2. दीपावली – आजीपर्व
  3. अनुभव – कॅन्सर
  4. मौज – रक्ताची गोष्ट
  5. मुक्त शब्द – गावे, मनात वसलेली
  6. प्रपंच – माझे खडी बोलीतील दोहे
  7. पासवर्ड – कुत्र्याची चित्रे
  8. बाल साधना – गोष्ट
Next Page »

Create a free website or blog at WordPress.com.