Anil Awachat (अनिल अवचट)

March 24, 2017

पुढे जाण्यासाठी मागे वळून पाहताना 15 Jan 2017

१५ जानेवारीला पुण्यात, बालगंधर्वला डॉ. आनंद नाडकर्णी, डॉ. अनिल अवचट आणि डॉ. अभय बंग या तिघांची एकत्र मुलाखत विवेक सावंत ह्यांनी घेतली. त्या तिघांशीही मो़कळ्या गप्पा झाल्या आणि त्याच्या कामांमागील प्रेरणांची उलगडा झाला. आनंद नाडकर्णी यांनी अवचटांची कामाची introvert पद्धत आणि अभय बंगांची कामाची extrovert पद्धत फार छान उलगडून सांगितली. अभय बंगांचे हे विचार फार महत्वाचे, दिशादर्शक वाटतात  –

आपल्या गरजा कमी ठेवल्या की आपल्याला मनासारखे काम करायचे स्वातंत्र्य मिळते. पैशासाठी ऊर फुटेस्तोवर काम करायची गरज राहत नाही.

– डॉ. अभय बंग

ह्या मुलाखतीचे संपुर्ण रेकॉर्डींग यू ट्यूबवर उपलब्ध आहे, तेच इथेही दिले आहे – अवश्य पहा!

June 29, 2013

अनिल अवचट यांना राष्ट्रीय पुरस्कार

Filed under: Events — Manish @ 10:34 pm
Tags: ,

anil-awachat-national-award

व्यसनमुक्ती क्षेत्रातील कार्याबद्दल डॉ. अनिल अवचट यांना २६ जून २०१३ रोजी राष्ट्रीय पुरस्कार राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते दिल्लीत प्रदान करण्यात आला. व्यक्तिगत कार्याबद्दल हा पुरस्कार केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालयातर्फे दिला जातो.

‘गर्द’ या पुस्तकातून अनिल अवचट यांनी ड्रग्जच्या विळख्यात अडकलेल्या तरुणांच्या व्यथा जगासमोर आणल्या. हे पुस्तक लिहितांना आलेले अनुभव आणि त्यानंतर पु.ल. देशपांडे यांनी दिलेले प्रोत्साहनामुळे आणि पत्नी डॉ.अनिता अवचट ह्यांच्या पुढाकाराने ‘मुक्तांगण’ हे व्यसनमुक्ती केंद्र चालू केले. व्यसनाधीन पुरुष, महिला, व्यसनाधीन पुरुषांच्या पत्नींसाठीचे कार्य तसेच विविध गट, कंपन्या, पोलीस दल यांचे जनजागरण यांसारखी अनेक कामे मुक्तांगणतर्फे गेल्या कित्येक वर्षांपासून केली जात आहेत.

अनिल अवचट यांच्या कार्याचा गौरव हा मुक्तांगण संस्थेचा, तसेच मुक्तांगणच्या संस्थापक डॉ.अनिता अवचट यांचाही गौरव आहे. या पुरस्काराबद्द्ल अनिल अवचट ह्यांचे हार्दिक अभिनंदन!

Photo Courtesy: Muktangan Rehabilitation Center, Pune, India

August 22, 2010

अनिल अवचट यांना साहित्य अकादमीचा बालसाहित्य पुरस्कार

Filed under: Events — Manish @ 11:02 pm

srushtit-goshtit

सृष्टीत ..गोष्टीत

अनिल अवचट ह्यांच्या “सृष्टीत ..गोष्टीत” ह्या पुस्तकाला साहित्य अकादमीचा पहिला बालसाहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे!! पुरस्कार वितरण समारंभ नोव्हेंबर मध्ये दिल्लीला होईल. आमच्या लाडक्या बाबाचे हार्दीक अभिनंदन!


दैनिक सकाळमधे प्रसिध्द झालेले हे अनिल अवचट ह्याचे मनोगत

“बालसाहित्याच्या प्रांतामध्ये साने गुरुजींच्या कामाची दोरी घेऊन मी पुढे चाललो आहे. मी मोठा आहे की छोटा हे मला माहीत नाही; पण माझे पूर्वसूरी मोठी माणसे होती, याची मला नक्कीच जाणीव आहे. बालसाहित्यातून मुलांमध्ये चांगली मूल्ये रुजू शकतील,” अशी भावना ज्येष्ठ साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल अवचट यांनी शनिवारी व्यक्त केली.

डॉ. अवचट यांच्या “सृष्टीत गोष्टीत’ या पुस्तकाला साहित्य अकादमीतर्फे उत्कृष्ट बालसाहित्याचा पुरस्कार जाहीर झाला. मॅजेस्टिक प्रकाशनने प्रकाशित केलेल्या या पुस्तकाच्या तीन वर्षांत तीन आवृत्त्या प्रसिद्ध झाल्या आहेत.

June 16, 2010

Paisa Fund Website

Filed under: Events,Links,Other Activities — Manish @ 4:20 pm

Anil Awachat Community's Paisa Fund Website

Paisa Fund initiative started by Anil Awachat community has its own website now. Check this out :
http://www.paisafund.org/

Though this is work in progress and we’ll keep adding content to this, it’s worth visiting! The account statements will be updated on this website now.

Please let us know if you can help making it better, any suggestions etc.

Thanks Geetanjali for putting this together.

February 11, 2008

अनिता अवचट स्म्रृतीदिन – प्रांजली अरेकर

Filed under: Events — Manish @ 12:30 pm

काल दि.१०.०२.०८ रोजी ११ व्या अनिता अवचट स्म्रृतीदिनानिमीत्त “संघर्ष सन्मान पुरस्कार” वितरणास जाण्याचा योग आला. आणि अक्षरश: कालची संध्याकाळ खुप श्रीमंत करुन गेली. गांजवे चौकातील एस.एम.जोशी सभागृहात ठीक ६.०० वा्जता कार्येक्रम सुरु झाला तो यशोने तीच्या सुंदर आवाजात गायलेल्या आईच्या आवड्त्या भजनाने.”वैष्णव जन तो” ने एकदम वेगळ्याच वातावरणात नेऊन ठेवले.

डॊ.आनंद नाडकर्णीनी सुत्रसंचालनाची सुत्रे घेतली आणि पुढचे २ ते २.३० तास मिस्कीली करत अजिबात कंटाळा येऊ न देता रंगतदार शैलीत पुरस्कार विजेत्यांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. “संघर्ष सन्मान पुरस्कार”हे नावच किती समर्पक आहे ना! आणि विशेष जाणवले ते मुक्तांगण मित्रचा साधेपणा. सगळा कार्येक्रम एकदम घरगुती वातावरणातला. कुठे डामडौल नाही की मिरवामिरवी नाही. प्रत्येक जण आपल्याला दिलेले काम न बोलता व्यवस्थीत करत होता मग ते आलेल्या मान्यवरांचे स्वागत असो वा स्टॊलवरती बाबाच्या पुस्तकांची विक्री असो. परत सगळे अगदी साध्या वेशात नाहीतर पुरस्कार वितरण म्हणजे तर जरीच्या साड्या, सुट आणि दिमाख,रुबाब ह्यांने भरलेला लग्नसमारंभ असतो. सुनंदाताई आणि बाबाने बाणवलेला साधेपणा सगळीकडे भरुन राहीला होता.

बाबाच्या बहिणीने ज्यांना सगळे प्रेमाने फुलाआत्या म्हणतात त्या प्रफुल्लाताईंनी आपले मनोगत मांडत सुनंदाताईंच्या आठवणी जाग्या केल्या. अजुनही त्यांची ऊर्जा मुक्तांगणमध्ये भरुन राहीलेली जाणवते हे एकुन खरंच वाटले की एकदा तरी सुनंदाताईंची भेट व्हायला हवी होती.

पुरस्कार विजेते होते राष्ट्र्पतीपुरस्कारविजेते आणि १५० हुन अधिक निर्मलग्रामे साकारणारे डॊ. अविनाश पोळ आणि मुकबधिर नॄत्यांगना प्रियांका ऊर्फ प्रेरणा आणि तिला अतिशय चांगल्या प्रकारे वाढवणारे तिचे आईवडिल उज्ज्वला व केशव सहाणे.

डॊ. अविनाश ह्यांनी अतिशय खुमासदार शैलीत गावात शौचालये व इतर मुलभुत सोयीसुविधा उभारताना सरकारी यंत्रणेपासुन गावकर्यांच्या असहकार धोरणापर्यंत कश्या अडचणी आल्या ते सांगितले. एका दंतशल्यविशारदाने परदेशात जाऊन पैसे न कमावता आपल्या गावाच्या सुधारणेसाठी इथेच राहुन अत्यंत प्रतिकुल परिस्थीतीमध्ये आपले ध्येय साध्य केले ते खरोखरच हसवता हसवता खुप विचार करायला लावणारे होते.

उज्ज्वला व केशव सहाणे ह्यांचे मनोगत तर प्रेक्षकांना वारंवार डोळे पुसायला लावत होते. इतका संघर्षमय प्रवास दोघांनी इतक्या सच्चेपणाने सांगितला की त्यांना सुद्धा २-३दा हेलावल्यासारखे झाले. आंतरजातीय विवाहामुळे घरचा आधार तुटलेला त्यात प्रियांका ६ महीन्यांची असतानाच ती चालु शकत नाही हे त्यांना समजले आणि काही दिवसांनी ती ऐकु शकत नाही हे लक्षात आले. आत्महत्येचा विचार पक्का झाला असताना उज्ज्वलालाईंच्या बहिणीने “हेलन केलरचे” पुस्तक देऊन परिस्थीतीशी लढण्याचे बळ दिले आणि जिद्दीने झगडत आज प्रियांकाला (जीचे नाव आता प्रेरणा ठेवले आहे )असे घडवले की ती आज उत्तम भरतनाट्यम करते. तिचे अरंगेत्रम पर्यंत शिक्षण झाले असुन ती सर्वसामान्य मुलींना आता भरतनाट्यम शिकवते.

एकुणच ह्या संघर्षाबद्द्ल लिहावे तेवढे थोडेच पण मुक्तांगण आणि बाबासारखे लोक असे परिस्थितीशी लढ्णारे लोक शोधुन काढतात आणि त्यांचा सन्मान करतात ह्यावरुन अजुनही कुठे तरी कोसळणार्या माणसांना सावरणारी माणसे कमी असली तरी अगदीच काही अंधार नाही असे वाटले.

बाबा आज आम्ही तुला “बाबा” म्हणतो ह्याचा मनापासुन फार अभिमान वाटतो. आणि असे समृद्ध करणारे अनुभव दिल्याबद्द्ल तुझे ,मुक्ताचे, यशोचे आणि सुनंदाताईंचे लाखो धन्यवाद !!!!!


Author : Pranjali Arekar

Next Page »

Create a free website or blog at WordPress.com.