Anil Awachat (अनिल अवचट)

June 16, 2010

Paisa Fund Website

Filed under: Events,Links,Other Activities — Manish @ 4:20 pm

Anil Awachat Community's Paisa Fund Website

Paisa Fund initiative started by Anil Awachat community has its own website now. Check this out :
http://www.paisafund.org/

Though this is work in progress and we’ll keep adding content to this, it’s worth visiting! The account statements will be updated on this website now.

Please let us know if you can help making it better, any suggestions etc.

Thanks Geetanjali for putting this together.

November 7, 2008

पैसा फंड, पहिली पाऊले…

Filed under: General,Other Activities — Manish @ 4:48 pm

पैसा फंड स्थापन होऊन काही दिवस झालेत आणि ह्या गेल्या काही दिवसात आम्ही थोडेफार पैसे जमवण्यात यश मिळवले आहे; याशिवाय ज्यांना मदतीची गरज आहे अशा २ संस्थाही निश्चित केल्या आणि त्यांना त्याप्रमाणे मदतही सुरू केली आहे.

आम्ही ७-८ जण (मी, अजित, अमित, यशोदा, मयूर, गीतांजली, रूपाली, संदीप आणि तेजश्री) ह्या गटाचे core members आहोत आणि स्वत: जमेल तसे पैसे ह्या खात्यात भरतो, त्याशिवाय इतरांनाही ह्या उपक्रमाची माहिती देऊन जर त्यांची इच्छा असेल तर त्यांचीही मदत ह्या खात्यात जमा करतो. इथे १००% पारदर्शकता असेल हे आम्ही स्थापनेपासूनच ठरवले होते आणि त्यानुसारच प्रत्येक महिन्याचे account statement हे इथे ब्लॉगवर तसेच अनिल अवचट ऑर्कुट कम्युनिटीवर प्रसिद्ध करतो.

बर्‍याच मित्र-मैत्रिणींनी आम्हाला मदत करायला सुरुवात केली आहे आणि आम्हीही सध्या २ संस्थांना आर्थिक मदत करायची ठरवली आहे. त्यापैकी एक आहे – खेळघर, ही संस्था गरीब वस्तीतील मुलांना शिक्षणासाठी मदत करते आणि खूप चांगल्या तर्‍हेने त्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देते. ह्या संस्थेला ऑक्टोबरपासून पुढील ६ महिन्यांसाठी मुलांच्या मधल्या वेळच्या खाण्यासाठी महिना २००० रुपये देण्याचे ठरले आहे आणि त्याप्रमाणे धनादेश खेळघरला सुपुर्त केले आहेत.

दुसरी संस्था आहे – निराधार बालसंगोपन अनाथ केंद्र – दापोडी जिथे मालनताई ह्या लहान अनाथ मुलांची जिवापाड काळजी घेतात. ह्या संस्थेलाही ऑक्टोबरपासून निदान पुढील ६ महिन्यांसाठी मदत करायचे ठरले आहे. मालनताईंचे यजमान नुकतेच वारले, आणि ह्या निराधार बालसंगोपन अनाथ केंद्राची गरजही जास्त आहे त्यमुळे त्यांना जास्त मदत करण्याची इच्छा आहे. त्यांना ऑक्टोबरमधे ३००० रुपये दिले, पण येत्या काही महिन्यात रक्कम वाढवावी अशी गरजही आहे आणि आमची इच्छाही आहे. जसे पैसे जमतील तसे ह्या केंद्राला दर महिन्याला किती पैसे देता येतील ते ठरवता येईल. साधारण ३५००० ते ४०००० अशी त्यांची दर महिन्याची गरज आहे.

आमच्यापैकी कोणी ना कोणी ह्या दोन्ही संस्थांशी चांगलेच परीचित आहोत, आम्ही स्वत: तिथे जाऊन त्यांचे काम पाहिले आहे, त्यांच्याशी बोललो आहे आणि ह्या दोन्ही संस्था चांगल्या आहेत हे अनुभवले आहे. सध्या ह्या दोन्ही संस्थांना ६ महिन्यासाठी मदत करायचे आम्ही ठरवले आहे!

ही नुकतीच सुरुवात झाली आहे, आणि जिथे आमच्या छोट्या मदतीनेही फरक पडेल तिथे जमेल तशी मदत करायची आमची इच्छा आहे. पैशापलिकडेही जाऊन जर प्रत्यक्ष तिथल्या कामात, प्रकल्पात (जसे वेबसाईट तयार करून देणे, काही इतर तांत्रिक मदत पुरवणे वगैरे) प्रत्यक्ष मदत करता आली तर आम्हाला अधिक आवडेल. फक्त आम्हीच नाही, तर अशा मदतीची इच्छा/गरज असलेल्या व्यक्तिंना आणि संस्थाना एकमेकाची माहिती पुरवणे अशा प्रकारे दुवा बनायलाही आम्हाला आवडेल. तुम्हाला कुठलीही मदत करायची इच्छा असल्यास अवश्य संपर्क करा. जर पैसा बचत गटाला न देता कुठल्याही संस्थेला थेट मदत करायची असेल तरीसुद्धा संपर्क करा, आम्ही जमेल ती सगळी मदत करू! गरजू आणि चांगल्या कामांना पैसा मिळावा अशी आमची इच्छा आहे, तो पैसा आमच्याच कडून मिळावा हे जरूरी नाही!

इथे बचत गटाचे सगळे तपशील आणि bank account statements बघता येतील –
https://anilawachat.wordpress.com/bachat-gut/

September 18, 2008

मायबोलीवरील अनिल अवचट ह्यांची मुलाखत

Filed under: General,Other Activities — Manish @ 12:59 pm

मायबोली या संकेतस्थळावर चिन्मय यांनी अनिल अवचट यांची सुरेख मुलाखात घेतली आहे.


डॉ. अनिल अवचट, म्हणजे बाबा, हे एक मुलखावेगळं व्यक्तिमत्व. विपुल, दर्जेदार लेखन, सामाजिक कार्य, असंख्य छंद, त्यांत त्याने मिळवलेले नैपुण्य आणि या सार्‍यांवर कडी करणारं त्याचं अस्सल माणूसपण…

‘मराठी साहित्यविश्वातील सारी पारितोषिकं डॉ. अवचट यांना द्यायला हवीत. कारण साहित्य म्हणजे समाजाला जाणणं, आणि डॉ. अवचट यांना हे उत्तम जमलंय,’ हे श्री. म. वा. धोंड यांचे उद्गार बरंच काही सांगून जातात.

या मुलाखतीत अनिल अवचट मुक्तांगण, त्यांचे अनेक छंद, कला, स्पर्धा अशा अनेक बाबींबर सविस्तर चर्चा केली. ती संपूर्ण मुलाखत इथे वाचता येईल –
संवाद – डॉ. अनिल अवचट यांच्याशी..

Blog at WordPress.com.