Anil Awachat (अनिल अवचट)

June 25, 2007

बाबाशी ‘ह्या हृदयीचे त्या हृदयी’

Filed under: General — Manish @ 5:24 am

Meeting baba on 24 June 2007यावेळेस बाबाच्या भेटीचे निमित्त होते Orkut वरील अनिल अवचट community ला एक वर्ष पुर्ण झाल्याचे (हो, Orkut वर खूऽऽऽऽऽप काही चांगले, constructive होते; पण उठसुठ Orkut वर बंदी हवी म्हणणार्‍यांना कोणी आणि कसे समजवायचे?). अजितला ‘काहितरी’ करुयात असे वाटत होतेच. यशोदा (आनिल अवचट ह्यांची मुलगी) बाबाशी बोलली आणि 24 June ला बाबाच्या घरीच भेटायचे असे ठरले. Community वर माहिती दिली आणि आम्ही वाट पाहत होतो 24 June ची!

सुदैवाने मला गेल्या काही महिन्यात बाबाला भेटायची ब‍र्‍याचवेळा संधी मिळाली आणि प्रत्येक वेळेस खूप काही मिळाले. बाबाची प्रत्येक भेट म्हणजे एक ‘भेट’च असते, म्हणजे gift या अर्थानी! आपण एवढ्या मोठ्या लेखकाचा वेळ घेतोय इ. इ. तो अजिबात वाटू देत नाही – मला ’ए बाबा’ च म्हणा असा आग्रहवजा हुकुम! त्यामुळे अगदी मोकळेपणे बोलता येते. त्याचे घरही त्याच्यासारखेच – warm, cozy and comforting – अगत्यशील! सर्वात महत्वाचा त्याचा स्वभाव आणि संवाद साधण्याचे कौशल्य. बाबाचे सर्व अस्तित्वच संवाद साधते…तो एकसुरी कधी बोलतच नाही. खूप associative movements, बोलके डोळे, कमालीचे साधे, सोपे पण आशयघन शब्द आणि एक लोभस disarming charm… दडपण असे येतच नाही आणि संकोच कधी गळून पडतो ते कळतच नाही… इतका की अगदी बाबाला नवीन गाण्याची फ़र्माईश करण्याइतका किंवा एखादा आगाऊ विनोद करण्याइतका… आणि हे आमच्याबद्द्लच नाही, तर त्यांचे मुक्तांगणमधील सहकारी दत्ता हे सुद्धा सहजपणे, “बाबा, तुमचे त्यावेळचे सहकारी म्हणजे… सगळे दाढीवालेच का?” असे मिस्किलपणे विचारुन जातात. साधाच प्रसंग, पण त्यांचे खेळीमेळीचे नाते लक्षात येते.

मी थोडा उशीरा पोहोचलो तेंव्हा बाबा सांगत होता, “वयोमानाप्रमाणे स्थिरवृत्ती व्हायला हवी, पण मी जरा जास्तच चुळबुळतो आहे!” आणि तो क्षणात बासरीवर गाणे, क्षणात नागेशचा पुणेकरांवरचा चुटकुला सांगत होता…आणि बाबाचे sketches,  wood-carvings आणि photos आमच्यात आपापसात फिरत होते. आम्ही मंत्रमुग्ध….आपल्या मातृभाषेत mesmerized!!! 🙂

ह्या भेटीच्या वेळेस बरेचसे नवीन चेहरेही होते जे मागील मुक्तांगण भेटीच्या वेळेस नव्ह्ते; त्यातील काही बाबाला पहिल्यांदाच भेटत होते. ते सुद्धा बाबाच्या सरळ, साध्या आणि कमालीच्या अकृत्रिम स्वभावावर ‘दिल-ऒ-जान से फ़िदा’ झाले. पुण्याहुन अजित (community owner उर्फ़ मालक! ;)), संजय, वर्षा, पद्मनाभ, सुश्रुत, प्रांजली, समीर, नीलकांत, वेद, केतकी, अक्षय, अदिती, यशोदा आणि मी हजेरी लावली. मुंबईहुन भर पावसातही तेजस, सुरज, गीतांजली, नागेश आणि रुपाली आवर्जुन आले होते. सगळ्यांनाच बाबाच्या भेटीची ओढ होती.

बाबा लेखक असुनही साधं, सोपं बोलतो – अगदी सहजपणे एका विषयावरुन दुसर्‍या विषयाकडे जातो… जितक्या सहजपणे तो बासरीवर एका सुरावरुन दुसर्‍या सुराकडे जातो, जितक्या सहजपणे तो बासरीवर “अभी ना जाऒ छोडकर…” आळवतो, तसच अगदी बा़गबा़न मधील (हो, तोच तो अमिताभ बच्चनवाला ‘तू तिथं मी’!)  “ऒ मेरे मखणा…” शिकत असल्याचे सांगतो किंवा बंगाली बिदाई गीत अचुक उच्चारसह, बारकाव्यासह शिकतो – आम्हालाही बंगाली ‘र’ हा कसा ‘र’ आणि ‘ळ’ च्या मधला उच्चार आहे ते समजावतो. जरी बाबाची संवाद साधण्याची हातोटी विलक्षण आहे, तरीही त्याला भाषणबाजीचा तिटकारा आहे.  त्याच्याच म्हणण्याप्रमाणे, “लेखन ही गुंतागुंतीची, जास्त complexity कडे जाण्याची, ती समजावुन घेण्याची प्रक्रिया आहे; तर भाषण/वक्तृत्व ही सोपं करण्याची, जास्त ढोबळ करण्याची  प्रक्रिया आहे.  जर लेखक जास्त भाषणात गुंतला तर ते त्याच्या लेखनावर हानीकारक परिणाम करू शकते. बाबाचा संवाद हा अगदी one-to-one आणि interactive असतो, कदाचित म्हणुनचं इतका परिणामकारक.

आम्हीही बोलत होतोच… चहा, ढोकळा आणि पॅटीस यांचा आस्वाद घेता, घेता… कोणी स्वतःला आवडलेले बाबाचे पुस्तक, एखादा ले‌‍‍ख, बाबाशी पहिली भेट, किंवा भेटी आधीची hesitations (वेद आणि केतकी बाबाला नुसतेच दुरून बागेत पहायचे, पण कधी बोलले नाही! :)) बाबाचे लिखाण कुठे स्वत:ला भिडले, कसे relate झाले ते सांगितले. संजयने बाबाला विचारले, “तुमची लेखनाची प्रक्रिया नेमकी कशी असते?” (हो; संजय ‘सकाळ’ मधेच काम करतो!! Typical journalist question na? 😉 ) पण खरचं सगळ्यांना ती उत्सुकता होतीच!  बाबाच्याच शब्दात, “माझे मन फारचं अडेलतट्टू आहे. काही करायचेच म्हणुन मला काही करता येत नाही. जेव्हा स्वतःहुन लिहावसे वाटते तेव्हाच लिहतो.” बाबानी यशोकडे Belgium ला असतांना महाजन सरांवरील लेख बारीकसारीक तपशीलांसकट लिहुन काढला तो कुठल्याही notes शिवाय… सगळा आठवणींतुन (Freud says you don’t really forget anything!). तसा कधी, कधी बाबा notes घेतोही – खासकरून जेंव्हा तो आता पुन्हा anatomy शिकतो आहे, एका नव्या दृष्टीकोनातुन! कदाचित तो त्यावर लिहिलही. बाबा फारसे पुर्नलेखन करत नाही. जसं नेहमी बोलतो त्याच भाषेत लिहितो. म्हणुनच त्याची पुस्तके अतिशय सोप्या भाषेत हलवुन टाकतात. त्याचे अनुभव त्याच ताकदीने, आणि तीव्रतेने वाचकांपर्यंत पोहोचतात. कोणीतरी मजेत complaint केली तशी बाबाची पुस्तके वाचण्याची सवय लागल्यावर इतर जड, शब्दबंबाळ पुस्तके वाचवत नाही. मी बाबाच्या शैलीपेक्षा त्याच्या contents च्या प्रेमात आहे. त्याहुनही जास्त तो एक व्यक्ती म्हणुन भावतो.

लेखनाशिवाय बाबा अनेक गोष्टीत गुंतलेला असतो…तोही मनापासुन. त्याच्या छंदाविषयी पुस्तकात त्याने याविषयी लिहलेही आहे. आम्ही प्रत्यक्षच त्याची sketches, wood-carvings आणि photos पाहात होतो. या सगळ्यातील त्याचे कौशल्य खूपच advanced आहे. अगदी proessional level वर प्रदर्शन भरविण्याइतके. लेखनाएवढी या छंदांना प्रसिद्धी नाही मिळाली तरी त्याचे ते wood-carvings बघतांना, sketches बघतांना, त्यातील वृक्षांमधले male-female human forms, त्यांचे एकमेकात मिसळुन जाणं, त्या लयीतुन subtly सुचवलेला interdependence….. क्या बात है! खरच, दाद दिल्याशिवाय रहावत नाही! त्याला विचारलही, हे सगळं कसे जमते? यशोचे उत्तर होते – ‘बाबाला sense of composition खूप चांगला आहे आणि वेगवेगळ्या माध्यमातुन तो व्यक्त होतो. कधी sketches मधुन, कधी photos मधुन, तर कधी wood-carvings/sculptures मधुन.’ मला वाटते, म्हणुनच बाबाची पुस्तकातील भाषाही खूपच ‘दृष्य’ असते. त्याची ही reportage शैली, त्याची ‘दिसले ते’ दाखवण्याची, अनुभुती देण्याची एक पद्धत असावी असे वाटते.  कुठल्याही गोष्टीने वेडावुन त्यात झोकुन देण्याच्या त्याच्या वृत्तीबद्दल काय आणि किती लिहावे? त्याचे ‘वेड’ वेडावुन सोडते. वर्षा म्हणाली, “मला बाबाने वेडी म्हणल्यावर खूप शहाणे असल्यासारखे वाटले.” खरच, असं वेडे झाल्याशिवाय ‘मज़ा’ नाही!

शिवाय इतक्या सगळ्या छंदात गुंतुनही बाबाचे सर्वात लोभस व भावणारे रूप म्हणजे कुटुंबवत्सल माणसाचे – एका पतीचे आणि पित्याचे. ‘सुनंदाला आठवतांना’ हा त्याचा एकच लेख कितीतरी सांगुन जातो. (खर तर या एका लेखावर एक दीर्घ लेख लिहायची इच्छा आहे…बघुया!) बाबानी पुस्तकांतुन त्यांच्या सहजीवनाविषयी, कौटुंबिक जीवनाविषयी खूप काही लिहिले आहे. यशोदाही त्यांच्या लहानपणीचे अनुभव सांगत होती. लहानपणी म्हणे मुक्ताला शाळा सोडायची होती. आणि बाबा तिला म्हणाला, “ठिक आहे, तसे करू.” ती २-३ दिवस बाबाबरोबर फिरली, आणि २-३ दिवसातच तिला पुन्हा शाळेत जायचे होते! 🙂 इथे वेगळेपण आहे त्यांच्या मुलांना निर्णयस्वातंत्र्य देण्याच्या वृत्तीत. त्यांना त्यांच्या निर्णयाची जवाबदारी घ्यायला शिकवण्यात. बाबा आणि सुनंदा पालक म्हणुन खूपच सुजाण, involved, evolved आणि वेगळे होते. यशोदाच्या epilepsy च्या त्रासाचा त्यांनी सहजपणे स्वीकार केला. आणि हे सगळं कुठलाही बाऊ न करता. यशोदा म्हणाली तिला वाटायचे की सगळेच आई-वडील असेच असतात; पण नंतर जाणवले की त्यांचे आई-वडील पालक म्हणुन किती वेगळे होते. बाबा म्हणतो त्याप्रमाणे त्या दोघांत (बाबा आणि सुनंदा) खूप communication होते, कित्येक वेगवेगळ्या विषयांवर ते तासंतास बोलायचे. डॉ. आनंद नाडकर्णी लिहितात त्याप्रमाणे त्या दोघांइतके जबरदस्त sharing & tuning असलेली खूप कमी जोडपी असतात. यशोदाने तिच्या epilepsy related surgery च्या वेळेस लिहिलेले आठवले. त्या surgery च्या दिवसात ती आणि पराग खूप बोलायचे; आणि तिथल्या इतर बायकांना त्याचे फारच अप्रूप वाटायचे. कधीतरी वाचलेले ‘You unknowingly imitate your parents & their relationship!’  आठवले.  ह्या दोघींचा (यशोदा आणि मुक्ता) फार हेवा वाटतो असे आई-वडील मिळाल्याबद्दल!

मला वाटते,   बाबाला इतकी unconventional lifestyle जगण्याची मुभा देणारा सुनंदा अवचट यांचा support हा फार महत्वाचा आहे. जेंव्हा बाबा नावाजलेला लेखक नव्हता आणि डॉक्टर म्हणुन practice करणार नाही असा निर्णय घेतला होता; तेंव्हा त्यांनी घेतलेल्या विविध कौटुंबिक व सामाजिक जवाबदार्‍या ह्याचा नुसता विचार करुनही दडपण येते. जर सुनंदाचा पाठिंबा नसता, किंबहुना इतके प्रोत्साहन, इतका uncondional support नसता तर बाबा इतके काही करू शकला असता का?  Hats off to her strong determination, resoulte support & encouragement!!  She must have been one amazing lady! सुनंदा अवचट यांना भेटता आले नाही, ही रुखरुख आहेच…आणि राहिलही.

बाबाला भेटुन नवल वाटते – इतकी unconventional lifestyle, इतके सामाजिक काम,  इतके लेखन, कित्येक छंद आणि कलाकृती करुनही तो असा बोलत असतो की, ‘त्यात काय मोठं, ते अगदी सहज झालं’.  तो म्हणतो त्याप्रमाणे त्यातच गुंतुन न जाता पुढे जायचे. किती मुलखावेगळा पण साधा माणुस आहे हा!

बाबाबरोबरचा वेळ हा अत्तरासारखा असतो. तसाच सुगंधित करणारा, तसाच उल्हसित करणारा पण उडून जाणारा. बाबाबरोबर वेळ खरच उडून जातो…time flies…बघता, बघता आम्ही ३-३.५ तास घालवले बाबा बरोबर. त्याचे sketches, wood-carvings, origami, photo पाहिले, बासरी ऐकली; गणपतीची एक वेगळी गोष्ट ऐकली, कबीरासारखी निर्गुणी भजनही ऐकली. यशोदा, अक्षय (बाबाचा पुतण्या) यांच्याकडून त्यांचे अनुभव ऐकले.  बाबाने भरभरून दिले आणि आम्हीही जीवाचे कान करुन ऐकले, आणि डोळे भरून पाहिले. जितके भरभरुन त्याने आनंदाने दिले, तितकेच आनंदाने आम्ही भरभरुन घेतले. आमच्या बोलण्यात एक असाही विचार आला की ह्या get-together च्या पुढे बाबाला भेटुन त्याच्याकडून काही शिकता येइल का किंवा एखाद्या weekend ला त्याच्याबरोबर कुठे बाहेर गेलो तर….(सपने तो सपने है आखिर! Who knows??) बाबा अर्थातच उत्साही आणि तय्यार! बघुया, कधी जमते ते…

या क्षणी तर नाही सांगता येत बाबाकडून काय आणि किती शिकता येइल. पण त्याच्याकडून घेण्यासारखे खूप काही आहे त्याच्या कलांव्यतरिक्त. त्याच्याकडून शिकता येते एक चांगला माणुस व्हायला… शिकता येते नात्यांविषयी… stereotype gender roles बाजुला ठेवून त्यांच्या सहजीवनातील सामंजस्याविषयी… अतिशय friendly, involved आणि non-authoritative pareting विषयी. खरच शिकण्यासारख खूप काही…

बाबा  doctor बनुन राहिला नाही ते बरंच झाले.  तसे चांगले doctors असतात खूप. पण एक पती म्हणुन, एक पिता म्हणुन बाबा फार वेगळा आणि ‘छाऽऽऽन’ आहे.  त्याच्याशी बोलतांना, यशोदाच्या बोलण्यातुन हे सहजपणे जाणवते…वारंवार. आई/वडील, पती/पत्नी आपण सगळेचजण होतो; आणि ही role-models सहजासहजी मिळत नाही.

बाबाची भेट मुक्तहस्ते देते. ज्याला जे हवे ते त्याने घ्यावे, जितके हवे तितके घ्यावे. त्याला भेटलो की जाणवतो त्याचा निरागस उत्साह, त्याचे कुतुहल आणि चेहर्‍यावरील शांत, समाधानी भाव – नागेशच्या शब्दात बाबाची भेट म्हणजे – ‘जिंदगी धुप तुम घना साया’.  बाबाच्या अकृत्रिम सहजपणामुळे वाटते, ‘अरे, ह्यातील खूप काही तर आपणही करु शकतो; चला करून तर पाहुयात!’. म्हणुनच बाबाची भेट मला उल्हसित करते, आणि माझ्यासारख्या कित्येकांना. He inspires people effortlessly & his enthusiasm is very contagious! म्हणुन तर त्याला भेटल्यावर झपाटुन ४ तासात हा लेख एकटाकी लिहिला (typing in Marathi was quite a herculean task though!) आणि पहाटे ५ पर्यंत जागुन हे type आणि publish केले.

बाबाची ही भेटही बरंच काही देऊन गेली. आम्ही आनंदात (आणि पावसातही) भिजतच परत निघालो पण मनात बाबाचे बासरीवरील ‘ये दिल अभी भरा नही…’ गुंजत होतेच! फिर मिलेंगे!!! 🙂


सुश्रुतने काढलेले बाबाबरोबरच्या भेटीचे photos इथे पहाता येतील – बाबाची भेट


I am writing such a big article in Marathi after a very long time….and for the first time using Baraha directly on blog. And it’s 5 am in the night/dawn..whatever. It is quite possible that there are few (many) mistakes/typos in the article as of now – in that case please do let me know & I’ll correct them. शुद्धलेखनाच्या चुकाही अवश्य सांगा.

Also, I think I have missed a few names of the people who attended, could you please remind me?

As usual, would love to hear from all of you!! Do add your comments here.


Create a free website or blog at WordPress.com.