Anil Awachat (अनिल अवचट)

January 30, 2022

अनिल अवचट, काही आठवणी…

Filed under: General — Manish @ 8:57 pm

अनिल अवचटांना प्रत्यक्ष भेटलो ते साधारण २००७ च्या सुरुवातीस. त्यांचे लिखाण (माणसं, स्वतःविषयी, कार्यरत, वेध…) आधीपासुनच आवडायचे. त्यांच्यामुळेच अभय बंग, बाविस्कर यांच्या कामांची ओळख झाली, मध्यमवर्गीय परिघाबाहेरच्या कित्येक प्रश्नांची माहिती झाली.

त्या पहिल्या भेटीतच त्याचा मला “ए बाबा” म्हण असा आग्रहवजा आदेश आम्हाला कायमचेच आपले करून गेला.

Orkut च्या दिवसात आम्ही काही मित्र अनिल अवचट community चे active members होतो. साधारण त्याच सुमारास मी अनिल अवचट हा blog सुरू केला. मी मराठीत लिहायला सुरुवातही त्याच वेळेस केली. ब्लॉग आणि Orkut community मिळून तेंव्हा आम्ही बरंच काही केलं (ब्लॉगवरच्या जुन्या पोस्टस् वाचल्यात तर लक्षात येईल). आम्ही मुक्तांगणलाही भेट दिली, पैसा फंड/बचत गट सारख्या उपक्रमांनी इतर गरजूंनाही मदत केली होती.

असेच वेगवेगळ्या निमित्ताने कित्येक वेळा बाबाला भेटलो. बाबाची ती अनौपचरिकता, आपुलकी नैसर्गिकच होती. तसाच त्याचा स्वच्छंदीपणाही नैसर्गिक होता. Long-term planning, त्या अनुषंगाने येणारी commitment ह्याचं त्याला वावडं होतं. पण उर्मीने तो खूप काही करायचा. कित्येक समाजिक कामं अगदी सहजपणे करायचा आणि त्या सगळ्या गुत्यांत गुंतूनही मोकळा रहायाचा. मोकळा आणि बहुतेक वेळा एका वेगळ्याच निरागस आनंदाने, उत्साहाने भरलेला असायचा. त्याच्या लेखनाने, विविध छंदांनी त्याला joy of creation भरभरून दिला असावा.

पुढे ओळख वाढल्यावर त्याचे काही नवे लिखाण/कविता जरा बोssर आहे हेही त्याला आगाऊपणे संगितले. तो फक्त हसला.

बाबानं भरभरून प्रेम केलं. वेड्या-वाकड्या लेखनाचंही कौतुक करून मला लिहायला प्रोत्साहन दिलं. कठीण प्रसंगी मदतही केली. नंतर Orkut गेलं. आम्ही कामाच्या व्यापात, संसारात गुंतलो. भेटी कमी झाल्या. गेल्या काही वर्षात तोही थकला. भेटलो तर आम्हाला ओळखायचाही नाही कित्येकदा. अशा वेळेस भेटूनही हुरहूर वाटायची, जुन्या गप्पा आठवायच्या.

आताही त्या गप्पांच्या फक्त आठवणी आहेत, आणि त्याने प्रेमाने दिलेली एक बासरी आहे…


अनिल अवचट ह्यांचे २७ जानेवारी २०२२ रोजी वयाच्या ७७ व्या वर्षी निधन झाले.
ही सकाळ वृत्तपत्रातली बातमी – ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अनिल अवचट यांचे निधन.

April 10, 2020

Announcement: New administrator

Filed under: General — Manish @ 7:04 pm
Tags:

10th April 2020

आज, दिनांक १० एप्रिल २०२० पासून सौ. यशोदा वाकणकर (डॉ. अनिल अवचट यांच्या कन्या) ह्या प्रामुख्याने ‘अनिल अवचट’ ब्लॉगचे प्रशासन (administration) आणि देखभाल (maintenance) सांभाळतील.

Starting today (10th April 2020), this blog will be primarily administered and maintained by Mrs. Yashoda Wakankar (Dr. Anil Awachat’s younger daughter).

I am hoping that she would revive this blog and pot updates more frequently here than what I could manage to do in the last few years.

~ Manish

More details:  About…

November 18, 2018

अनिल अवचट ह्यांच्या अनुभव २०१८ दिवाळी अंकातील ‘गुणगुणसेन’ या लेखातून

उस्ताद अमीर ख़ाँ असेच संगीत हाच प्राण असलेले आणि त्यातच देहभान हरपून गेलेले कलावंत. ‘गुणगुणसेन’ ह्या लेखात अनिल अवचटांनी त्यांच्या अशाच काही आठवणी सांगितल्या आहेत – एकदा सरोदवादक अमजद अलींबरोबर प्रेक्षागृहात मध्यरात्र होईपर्यंत दंग होऊन एकटेच गात होते, कोणीही प्रेक्षक नसल्याचे त्यांच्या लक्षातही आले नाही. हे ते दोन किस्से –

amir-khan-1

amir-khan-2

शेवटी उस्ताद अमीर ख़ाँच्या गाण्याविषयी, भीमसेन जोशींच्या उधृतासकट –

amir-khan-3

अनुभवच्या अंकाविषयी मी दुसर्‍या ब्लॉगवर एक वेगळा लेख लिहिला आहे, तो इथे वाचता येईल – कसे हरपते असे देहभान?

March 24, 2017

पुढे जाण्यासाठी मागे वळून पाहताना 15 Jan 2017

१५ जानेवारीला पुण्यात, बालगंधर्वला डॉ. आनंद नाडकर्णी, डॉ. अनिल अवचट आणि डॉ. अभय बंग या तिघांची एकत्र मुलाखत विवेक सावंत ह्यांनी घेतली. त्या तिघांशीही मो़कळ्या गप्पा झाल्या आणि त्याच्या कामांमागील प्रेरणांची उलगडा झाला. आनंद नाडकर्णी यांनी अवचटांची कामाची introvert पद्धत आणि अभय बंगांची कामाची extrovert पद्धत फार छान उलगडून सांगितली. अभय बंगांचे हे विचार फार महत्वाचे, दिशादर्शक वाटतात  –

आपल्या गरजा कमी ठेवल्या की आपल्याला मनासारखे काम करायचे स्वातंत्र्य मिळते. पैशासाठी ऊर फुटेस्तोवर काम करायची गरज राहत नाही.

– डॉ. अभय बंग

ह्या मुलाखतीचे संपुर्ण रेकॉर्डींग यू ट्यूबवर उपलब्ध आहे, तेच इथेही दिले आहे – अवश्य पहा!

July 8, 2016

संभ्रम आणि धार्मिक या त्यांच्या पुस्तकांबद्दल बोलताना अनिल अवचट

स्वतः अनिल अवचट त्यांच्या “संभ्रम” आणि “धार्मिक” या पुस्तकांबद्दल बोलतात आहे, जरूर बघा –

Next Page »

Blog at WordPress.com.