Anil Awachat (अनिल अवचट)

February 27, 2009

A Poem that Anil Awachat wrote for his wife Sunanda

Filed under: General — Manish @ 4:06 pm

I recently read this poem (Thanks to Prasad) that Anil Awachat has written for his wife, Sunanda and was quite touched by it. Here it is –


Anil Awachat and his wife Sunanda

मी घेऊ उखाणा ?
ती आज नसली तरीही ?
तशी ती आहेच ना समोर,
पानात पान पिंपळ पान मग शेवटी गोरी पान,
नको नको ती नव्हतीच गोरी,
पण अंतरंग वाह वाह !!!
त्या इतके सुंदर काहीच नसेल !
मग ती सुंदर ला जमणारी आधीची ओळ ?
नको मग तिच्यातली ती पाझरती माया ?
त्याला कुठून आणावा जुळणारा शब्द ?
काया ? छे छे ! ते कधीच नव्हते तिचे वैशिष्ट्य,
मग तिच्या आजारातही प्रसन्न असणे?
प्रसन्न ? त्याला जुळणारे खिन्न ?
छे ती कधीच कधीच नव्हती शेवट पर्यन्त !
तिचे असामान्य धैर्य ?
छे बुवा !!! त्याला ही काही जुळत नाही !
मग तिच्या डोळ्यातले वास्तल्य ?
तिचे मार्दव ?
तिचा हळुवार आश्वासक स्पर्श !

कशालाच जवळचा शब्द सुचेना ,
जाउ दे ती उखाण्यात काय , कशातच बसत नाही !
कशातच मावत नाही अशी होती ती !

© अनिल अवचट

17 Comments »

 1. hya kavitech ugam:

  esakal madhe Gadchirolitil Nirman shibiratil aathavan ekane lihile hoti. tya sandhyakali anekanni ukhane ghetale. pan baba ne nahi ghetala. to karyakram samapalyawar babala hi kavita suchali.

  मकरसंक्रांतीला वाण वाटताना तसेच लग्नात उखाणे घेण्याची परंपरा आपल्याकडे असली तरी त्याची फारशी दखल कुणी घेत नाही. काही जुन्या संस्कारांसह उखाण्यांची परंपराही लोप पावत चालली असताना शोधग्रामात नुकत्याच पार पडलेल्या निर्माण शिबिरात उखाण्यांची अनोखी मैफल रंगली होती. यावेळी प्रख्यात साहित्यिक अनिल अवचट यांचे सोमवारी (ता. पाच) आगमन झाले आणि त्यांच्याच साक्षीने हा कार्यक्रम झाला.

  सोमवारी सायंकाळच्या प्रार्थनेनंतर “सर्च’चे अभियंते विवेक कडूकर यांचे लग्न जुळल्याची बातमी येऊन थडकली. त्याबाबत चर्चा सुरू असताना आठ दिवसांवर तिळसंक्रांत असल्याने साऱ्यांनाच आता उखाणा घ्यायला हवा, असे वाटले. प्रथम श्री. कडूकर यांनाच उखाण्याचा आग्रह धरण्यात आला. पण, त्यांनी निर्माणच्या तरुणाईचा हट्ट पुरवला नाही. मग, डॉ. बंग यांनीच पहिला उखाणा घेतला. त्यांच्या पत्नी डॉ. राणी बंग यांचे माहेर चंद्रपूर असल्याची आठवण करून देत ते म्हणाले, “भाजीत भाजी कांद्याची, राणी माझी चांद्याची’, हा उखाणा ऐकताच राणी बंग यांनीही प्रत्युत्तराचा उखाणा घेतला. तो असा, “टाळ वाजे, मृदुंग वाजे, मधुर वाजे वीणा, अभयरावांचं नाव घेते, वंदेमातरम्‌ म्हणा’.

  त्यानंतर साऱ्यांनाच हुरूप आला. आपल्या पत्नीने घेतलेला उखाणा सांगताना श्री. अवचट म्हणाले, सुनंदा आज हयात नसली तरी तिचा तो उखाणा आजही आठवतो. ती म्हणाली होती, “नावा-नावांची काय बिशाद, अनिल आहे माझ्या खिशात’. माजी आमदार हिरामण वरखडे यांनी गमतीदार किस्सा सांगत त्यांच्या पत्नीचा उखाणा सांगितला, तो असा “केळीचं पान चुरूचुरू फाटे, हिरामणरावांचं नाव घेताना कसंसच वाटे’. माझी बायको हा उखाणा घेत असताना मी दाराच्या फटीतून बघितल्याचे ते म्हणाले. त्यानंतर वेळ होती अरुण देशपांडे यांची. एरवी जल, पर्यावरण, कृषी या विषयांवर तासन्‌तास बोलणारे मुलांचे “अरूकाका’ उखाण्याची वेळ येताच गोंधळून गेले. मग, शिबिरातली काही मंडळी त्यांच्या मदतीला आली. ते बांबूचे डोम (घुमट) करण्यात निष्णात असल्याने अनेकजण त्यांना गंमतीने “डोमकावळा’ म्हणून चिडवतात. ते म्हणाले, “मी आहे “डोम’ कावळा, बांधत होतो डोम, सुमंगलाचं नाव घेतो आठवून स्वीट होम’, या उखाण्यावर सारेच खळखळून हसले. त्यांच्या पत्नी सुमंगला यांनी लगेच उखाणा घेतला, “रामाची सीता, कृष्णाची मिरा, अरुण आहे माझ्या हृदयाचा हिरा’ यावर सारेच फिदा झाले असताना प्रख्यात लेखक नंदा खरे डोळे मिटून याचा आनंद घेत असल्याचे साऱ्यांना दिसले. मग, त्यांनाही आग्रह करण्यात आला. ते म्हणाले, “विद्याचं नाव घेण्याची किती केली तयारी, ऐनवेळी विसरलो त्यासाठी सॉरी’ या उखाण्याने पिकलेली खसखस थांबत नाही, तोच मैफलीत साऱ्यांचे लाडके दत्ता बाळ सराफ आले. त्यांना उखाणाच सुचत नव्हता. शेवटी नंदाकाकांनी त्यांच्या कानात घातलेला उखाणा त्यांनी हसतहसत घेतला, “सणात सण दिवाळी-दसरा, राखी सावंतचं नाव घेतो कुसुमचा नवरा’ या उखाण्याने पुन्हा हास्याची कारंजी थुईथुई नाचू लागली.
  अविवाहितही उत्साहित

  मोजकी विवाहित मंडळी आपल्या जोडीदाराच्या नावाने उखाणे घेत असतानाच अविवाहितांनाही उखाणा घेण्याची लहर आली. पण, साऱ्यांनीच उखाणे घ्यायचे ठरवले तर रात्र इथेच संपायची, हे लक्षात घेत सिद्धार्थ प्रभुणे ऊर्फ शास्त्री याने समस्त अविवाहितांच्या वतीने “चांदीच्या ताटात जिलेबीचे तुकडे, घास भरवते मरतुकड्या तोंड कर इकडे’ म्हणत खणखणीत उखाणा घेतला.

  Comment by Yashoda — February 28, 2009 @ 9:40 am | Reply

  • Kavita khupach chhan aahe. Manala sparshun geli Pan starting page disat nahi

   Comment by jayashree — April 29, 2011 @ 12:37 pm | Reply

 2. मी एक ्डॉ.अनिल अवचटांचा चाहता. या बॉगच्या प्रेमात पडलेला.

  Comment by harekrishnaji — March 1, 2009 @ 8:54 am | Reply

 3. धन्यवाद हरेकृष्णाजी! 🙂
  यशो- ह्या कवितेच्या उगमाबद्दल इथे लिहील्याबद्दल शतश: धन्यवाद!

  Comment by Manish — March 3, 2009 @ 12:46 pm | Reply

 4. I am also Anil’s fan. Now I will be keeping an eye on this blog.

  Comment by Mangesh Nabar — March 29, 2009 @ 9:52 pm | Reply

 5. Thanks for your comments Mangesh!

  Comment by Manish — April 2, 2009 @ 12:14 pm | Reply

 6. Respected Baba i am already your fan for many years i liked your blog very much Madhavi liked your article on Ukhane keep writing as usual thanks

  Comment by shekhar purandare — April 11, 2009 @ 6:40 pm | Reply

 7. va va kai sundar kavita vachayala milali. Baki itar “UKHANEHI” jamoon aalet.
  dhanyavad,
  shashank

  Comment by shashank purandare — July 18, 2009 @ 4:41 pm | Reply

 8. अनिल अवचट यांच्या लिखाणावर पोषण झालेला मी..

  हां ब्लॉग पाहून खूप छान वाटलं..

  माझ्या ब्लॉग वर येण्यासाठी सर्वांना निमंत्रण..छान वाटेल..

  http://gnachiket.wordpress.com

  Comment by ngadre — September 7, 2009 @ 1:20 pm | Reply

 9. शब्द जुळण्यापेक्षा सुर जुळणं महत्वाचं. त्या, तुम्ही कविता जगला. खुप दिवसानी मनाला स्पर्श करणारी कविता वाचली. धन्यवाद

  Comment by नरेन्द्र प्रभु — September 24, 2009 @ 10:31 pm | Reply

 10. Apla AKSHAR diwali ankatil NIlu Fule va Alurkar yanchya varil lekh vachala. atyant bhavala mhanun he lihinyache prayojan. hya dhon landmark vyaktinche vishesh va vegale kangore khup sundar va prabhavipane mandlet tya baddal manapasun abhinandan. mi koni sahityik kinva samikshak nahi tya mule mala tumachya likhanavar lihinyacha tasa kontahi legal kinva moral adhikar nahi.

  pan mazya swalp mate Nilu Fulenchya takdichya kalakarala patilkichya choukonat bandhun marathi chitrapat srishtine eka prachand potential aslelya mansache BONSAI karun takle. tyanchya vinodi va matured adakarila seema padlya va eka versatile kalakaravar aparimit anya zala. tyanchya eka veglya kalidiscope madhun veglya dimensions che kelele likhan atantya prabhavi zale aahe.

  hich goshta Shri. Suresh Alurkaranchya babtit mhanta yete. mazya mate alurkaranchyamule maharahtrala classical sangeetatle exposure milale. tyani prakashit kelelya anek audio cassettes mule anek matabbar kalavantache uttam sangeet gharagharat pochale. tyanchya hya karya sathi, CLASSICAL MUSICMADHYE RUCHI ASANYARA pratyek marathi manasane va consequentially, sampurna maharashtrane tyanche kayamche rhun manale pahijet. parantu dudraivane kalaughoat tyanche karya vasirle janyachi shakyatach jasti aahe.

  maza tasa donhi vyaktishi kontahi sampark kinva interaction navhati.parantu aplya lekhamule hya don vyaktinchya vegale panachi atyant tivratene janiv zali.

  mi ek samanya manus aahe tya mule maze tumchyasarkhya vidvan vaktishi kontehi vaicharik sadharmya aasu shakat nahi, parantu classical sangeetachya babtit aapli va mazi avad, he ekmev samya lakshat aale va mhanun he lihinyache dhadas kele.

  PT. RAVISHANKER, NIKHIL BANERJEE, BHIMSEN JOSHI, KUMAR GANDHARVA, AMIRKHANSAHEB, MOGHUBAI, KESARBAI, SALAMAT NAJAKAT ALI, GULAM MUSTAFA KHAN hya abhedya killyanche soft form madhil sadharan 9GB che MP3, recording mazyakade aahe va te aankhi enrich karavayachi mazi icchha aahe. jar apli sanmati asel tar aplya kadil musical treasure baddal jar mala kalavalet tar me apalyashi sampark sadhen.

  FIRUN EKDA UTTAM LEKHABADDAL ABHINANDAN VA AABHAR.

  DHANYAVAD.

  SATISH. THAKAR.

  Comment by satish thakar — December 28, 2009 @ 1:17 pm | Reply

 11. kavita khup chaan hoti
  kanchan

  Comment by kanchan kulkarni — January 16, 2010 @ 4:16 pm | Reply

 12. तुमच्याबद्दल काय लिहावं? प्रश्न पडतो… अनिल नावाचे हे व्यासंगी व्यक्तिमत्व माझे मामे सासरे श्री सुधाकर कुलकर्णी यांच्याकडूनच ऐकायला मजा येते…

  Comment by माझी ब्लॉग शाळा ! — February 7, 2010 @ 4:18 pm | Reply

 13. Sundar !

  Comment by kailas — May 15, 2011 @ 5:54 pm | Reply

 14. मी पहिले मन अन भेटलो मनाला ,
  तुझ्या अन माझ्या अंतकर्नात,
  जेव्हा मी असतो माझा, त्यावेळेस भेटतो मनाला,
  जेव्हा तू आसतोस तुझा त्यावेळेस भेट मनाला,
  त्याला अगं पण म्हणतो अन आरे पण…!

  मन असते नितळ , स्वच्छ,
  मन असते शीतल, शांत,
  मन असते कोमल, मृदु,
  मन असते कठोर अन निकोप ही…!

  मन असते स्वच्छंदी,
  मन असते गुलाबी,
  मन असते काटेरी,
  मन असते तुझ्यातल्या ‘स्व’ चा,
  गोड गंध, वेध, वास्तव आणि अंत ही…!

  मन असते अगं अन अरे ही ,
  मन असते पाणी अन आग ही,
  मन असते तेजस अन अंधार ही,
  मन असते अविचल अन चलबिचल ही,
  मन असते थांबलेले अन धावते ही,
  मन असते पोलीस अन चोर ही,
  मन असते गवता वरचे दव बिंदू अन डोंगरा वरचा दगड ही…!

  मना सारखे मन च आसू शकते,
  प्रत्येकाचे ते वेगळे आसू शकते,
  भेट तूच एकांतात, जाऊन तुझ्या मनाला, कारण…
  तुझे ‘मन’ च उत्तर देऊ शकेल तुझ्या प्रश्नाला.

  कैलास…

  Comment by kailas — May 15, 2011 @ 6:08 pm | Reply

 15. KHUP DIVSAPASUN SAMAJSEVAKASHI SAVAND SADHAVA , TYANCHE ANUBHAV SHARE KARAVET VATAYCH. LAST WEEKMADHE TUMCHYA MULICHA TUMCHYVISHAYCHA LEKH VACHNYATR ALA. SAHAJ SEARCH KELE TAR FACEBOOKVARPROFILE PAHILA . COMMENT KAY LIHAYCHI HE N THARAVATA REPLY KARTEY. PUMACH LIKHAN VACHEL ANI MAG PARAT SAVAND SADHEL. ASHA AHE MALAHI TUMHI CHAGLA ANUBHAV SHARE KARAVA. MAZYA DNANAT BHAR PADEL. DHANAVAD.

  Comment by JYOTI MANE — June 23, 2011 @ 1:59 pm | Reply

 16. […] A Poem that Anil Awachat wrote for his wife Sunanda […]

  Pingback by 29th AUGUST 1944 DR. ANIL AVCHAT – BABA – | healmed — August 31, 2015 @ 10:48 am | Reply


RSS feed for comments on this post. TrackBack URI

Leave a Reply to kailas Cancel reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Blog at WordPress.com.

%d bloggers like this: