Anil Awachat (अनिल अवचट)

February 17, 2008

पुस्तक रसग्रहण : छंदाविषयी (रामेश्वर महाले)

Filed under: Books — Manish @ 4:09 pm

chhandavishayi1.jpgआपल्या मुलाकडे बोट दाखऊन एक शिक्षक असलेला माणूस म्हणाला ,”हा चित्र चांगलं काढतो म्हणून चित्रकलेच्या क्लासला घालावं म्हणतो;पण पुढे त्याचा काय फायदा ?”
शिक्षक असलेल्या माणसाने असं विचारावर काय उत्तर देणार ?

एखादा छंद माणसाला नक्की काय देतो ? हा खरंच अंतर्मुख करणारा प्रश्न आहे.

या प्रश्नाचं नेमकं उत्तर नाही देता येणार;पण एका माणसाला दहा-बारा वेगवेगळ्या प्रकारचे छंद असतील तर………

तर माझ्या शिक्षक मित्राला मी अनिल अवचट यांचं ‘छंदाविषयी’ हे पुस्तक वाचायला देईल.

चित्रकला,स्वयंपाक,ओरिगामी,फोटोग्राफी,लाकडतील शिल्पं,बासरी,वाचन आणि अजुन कितीतरी छंदांविषयी माहिती देणारे हे पुस्तक वाचनीय आणि छन्दिष्टानसठी अनुकरणीय आहे. “एखाद्या नव्या गोष्टीकडे लक्ष वेधले जाते आणि आपण त्याच्या मागे लागतो,तो शिकण्याचा काळ मला फार रम्य वाटतो.आपली बोटे हळूहळू वळू लागतात,डोकं त्या दिशेने चालून पकड घेऊ लागते आणि आपल्याही हातातून किंवा गळ्यातून ती नवी गोष्ट उमटू लागते.मग त्याचे वेड लागते. तीच गोष्ट अनेकदा करू लागतो.नंतर ती दुसर्‍याला देऊ लागतो.प्रत्येक पायरीचा आनंद वेगवेगळा असतो.” अशा शब्दांत प्रस्तावनेतच आपली भूमिका लेखक स्पष्ट करतात.

चित्रकलेचं वेड अवचटना लहानपणापासूनच असल्याचं स्पष्ट होतं. त्यांचा चित्रकलेवरचा लेख म्हणजे मनोहर नावाच्या चित्रकार मित्राची गोष्ट आहे. आपल्या ओघवत्या शैलीत लेखक चित्रकलेचा विकास कसा कसा होत गेला, मनोहारकडून चित्र ‘बघायला’ कसं शिकले हे सांगतात. लहानपणी पाटीवर काढत असलेल्या शिवाजी पासून ओइल पेनटिंग्ज आणि हल्ली छोट्या कार्डावर काळ्या पेनने काढलेली चित्र हा प्रवास मुळातूनच वाचण्यासारखा आहे.

या लेखात त्यांनी कॉलेजात असताना पुतळा बनवल्याची गोष्ट सांगतात आणि लाकडातून शिल्प बनवण्याची प्रेरणा कशी मिळाली हे कळते. स्वयंपाक करायला लेखक गारजेपुरता शिकले तरी नंतर त्या प्रांतात ते कसे शिरत गेले;कोणा कोणा कडून काय काय शिकत गेले हे इतक्या सुरेखपणे सांगतात की असं वाटावं -अवचट भाजी चिरता चिरता काही टिप्स देताहेत आणि आपण समोर बसून ऐकतोय. स्वयंपाक ही सुद्धा एक कला आहे आणि पुरूष मंडळीही त्यात कसे पारंगत होत जातात हे जरूर वाचायला हवं.
एका मित्राच्या जपानी पेनफ्रेंड्ने कागदाचा पक्षी पाठवला आणि एका नव्या कागदी जगाची ओळख झालीं हे अजबच वाटतं. अतिशय चिकटीने पाठपुरावा करत त्यांनी ही कला आत्मसात केली आहे.प्रवासात,एखाद्या कार्यक्रमात,अगदी सिनेमा बघतांनाही ते ओरिगामी करतात-अशी ही चौकोनी कागद घेऊन करता येण्यासारखी कला. याचप्रमाणे लेखक आपल्या फोलोग्राफी,बासरी,वाचन या छांदांची गोष्ट सांगतात. लेखक असूनही आपलं वाचन कसं मर्यादित होतं हेही ते सहजपणे सांगून टाकतात.

‘इतर छंद’ या शेवटच्या लेखात दोरिचे खेळ,जादू,बाजा असे एक एक छंद सांगत जातात आणि हा म्हणजे एकदम खल्लास माणूस आहे याची खात्रीच पटते. आपल्या छांदांविषयी सांगत असतांना लेखक आजूबाजूच्या लोकांच्या कॉमेन्टसचा उल्लेख करत जातात आणि ते वाचतांना मजा येते-विशेषता: मुक्ता आणि यशोदा लक्षात राहतात त्या यामुळेच.या आपल्या मुलींनाच त्यांनी पुस्तक अर्पण केलंय;तसेच पुस्तकाचा चौकोनी आकार आणि मुखप्रुष्ठ्ही लक्षात राहतं.आतील काही पानांवर छापलेली चित्र ,ओरिगमीचे फोटो,लाकडतील शिल्पांचे फोटो अशांमुळे पुस्तक आपोआपच संग्रही (आणि थोडे महागही!) झाले आहे.

अतिशय साध्या-सोप्या भाषेत लिहिलेले हे लेख वाचणार्‍या प्रत्येकाला नक्कीच काहीतरी छंद जोपासायला लावतील यात शंका नाही.


छंदाविषयी : रामेश्वर महाले

6 Comments »

 1. रामेश्वर – पुस्तक रसग्रहण खूपच म्हणजे खूपच छान झाले आहे. तुझ्याच भाषेत सांगायचे झाले तर एकदम “खल्लास”!! तू सुरुवात फार आकर्षक केली आहेस. छंद माणसाला इतके काही देतात की ते पैशाने कधीच विकत घेता येत नाही. खरच लिहीत रहा जमेल तसे, तू खरच छान लिहितोस! 🙂

  Comment by Manish — February 17, 2008 @ 4:11 pm | Reply

 2. Rameshwar, nice review. Its very good, because you have written what you feel from heart. You have not written only what is in this book.
  keep it up, keep on writting, you have that strength!

  Comment by Yashoda — February 17, 2008 @ 4:28 pm | Reply

 3. रामेश्वर, तू लिहीलेला रिव्ह्यू एकदम आवडला, आणि हे पुस्तक ही माझे आवडते आहे कारण मी वाचलेले ते बाबाचे पहिले पुस्तक आहे. त्यामुळे ते खास आहे. तुझी लिहीण्याची शैली आवडली. अजून लिहायला हवे होते असे वाटणे म्हणजे लिखाण जमल्याची पावती असते. तुझे लिखाण वाचून तसे वाटले. तू अजुन काही लिहायची वाट बघत आहोत.

  Comment by Tejashree — February 17, 2008 @ 8:59 pm | Reply

 4. Thanx Rameshwar,

  Kharacha khup chaan lihile aahes!

  Patakan sagal dolya samor aale pustakatale
  aikhadya chitrapata saarkhe….

  Will say short and very sweet!

  Comment by Varsha — February 18, 2008 @ 12:31 am | Reply

 5. फ़ारच छान लिहिलयस रामेश्वर !! विशेषत: सुरवात आणि शेवट छान आहे 🙂

  Comment by rupali — February 19, 2008 @ 6:11 pm | Reply

 6. Somehow i missed the point. Probably lost in translation 🙂 Anyway … nice blog to visit.

  cheers, Unthoughtful.

  Comment by Unthoughtful — June 19, 2008 @ 4:04 pm | Reply


RSS feed for comments on this post. TrackBack URI

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Create a free website or blog at WordPress.com.

%d bloggers like this: