Anil Awachat (अनिल अवचट)

March 11, 2007

बाबांचा लेख: ड्रग्जचा विळखा

Filed under: General — yogesh @ 7:21 pm

पुण्यात झालेल्या रेव्ह पार्टीच्या निमित्ताने लोकसत्ताच्या पुणे वृत्तांत मधील ‘ड्रग्जचा विळखा’ या सदरात आलेला अनिल अवचटांचा लेख खाली वाचा:

पुणे वृत्तांतची इंटरनेट आवृत्ती उपलब्ध नसल्याने इथेच तो देत आहे.

संस्कृतीचा र्‍हास

समाजात उपभोगवाद वाढत चालला आहे, हे ‘रेव्ह पार्टी’ आणि त्यात गुंतलेल्या धनिक बाळांना झालेल्या अटकेच्या निमित्ताने ठळकपणे समोर आले आहे. ‘मला मजा मिळाली पाहिजे. त्याचे परिणाम विचारणारे तुम्ही कोण?’ अशी बेदरकारी या उपभोगवाद्यांमध्ये आहे. ‘रेव्ह’ आणि तत्सम प्रकारच्या पार्ट्यांमधून तरुणांना नवीन व्यसनांची ओळख करून दिली जाते. त्यातून अगदी सगळ्यांना नाही, तरी काहींना अमली पदार्थांची सवय जडते. तिचे पर्यवसान व्यसनात होते. थोडक्यात ‘रेव्ह पार्ट्या’ झाल्या नाहीत, तर ही मुले वाचतील इतके हे सरळ गणित आहे. अशा पार्ट्यांमागची प्रेरणा मौजमजाच असते. मौजमजेचे काही सुसंस्कृत मार्ग शिल्लक राहिले आहेत की नाहीत, हा खरा प्रश्न आहे. पकडले गेलेले तरुण एकत्र जमून संगीताच्या तालावर नाचले असते, तर कोणाची हरकत असण्याचे काहीच कारण नव्हते. दुर्दैवाने ‘बीअर पिण्यात काही गैर नाही,’ असे मानणार्‍या पालकांच्या मुलांकडून असे समंजस पाऊल उचलले जाणे संभवत नाही.

‘रेव्ह पार्टी’ किंवा तत्सम प्रकारांची वाढती संख्या हे समाजस्वास्थ्याच्या दॄष्टीने धोक्याचे चिन्ह आहे. संस्कृतीच्या र्‍हासाचेच ते लक्षण आहे. अमली पदार्थाच्या सेवनाचे मानसिक परिणाम खूप खोलवर असतात. अमली पदार्थांचे सेवन केलेला मनुष्य एका विशिष्ट भावनेच्या आहारी जातो आणि त्याला व्यसन लागते. मेंदूवर हमखास परिणाम करणारे हे पदार्थ घातक आहेत; कारण त्यात चटक लावणारे घटक असतात.

‘मुक्तांगण’ पुरते बोलायचे, तर आमच्याकडे येणार्‍या रुग्णांमध्ये ८० टक्के व्यक्ती दारूच्या आहारी गेल्या असतात; तर २० टक्के या अमली पदार्थ आणि अन्य व्यसनांचे सावज बनलेल्या असतात. या व्यसनांचे चार गटांत वर्गीकरण केले जाते. अफू (हेरॉईन व गर्द), मारुवाना ड्रग्ज (गांजा व चरस), झोपेच्या गोळ्या आणि सिगारेटस हे ते गट होत. दारूबाजांना ज्याप्रमाणे नातेवाईक व्यसनमुक्ती केंद्रात आणून सोडतात, तसे रस्त्यावरच्या गर्दुल्ल्यांबाबत घडत नाही, हे लक्षात घेतले पाहिजे. गर्दच्या आहारी गेलेली व्यक्ती सुशिक्षित घरातील असेल, तरच तिला केंद्रात दाखल केले जाण्याची शक्यता निर्माण होते. नेमकी हीच वस्तुस्थिती लक्षात घेऊन ‘मुक्तांगण’ने वस्त्यांवस्त्यांमध्ये जाऊन शिबिरे घेण्यावर भर ठेवला आहे. मानवी मनाचा थांग संत महंतांनाही लागलेला नाही. अमली पदार्थांच्या भयावह समस्येवर उपाय सुचवण्याच्या अपेक्षेने मानसोपचारतज्ज्ञांकडे पाहिले जाते. मात्र, असा तज्ज्ञसुद्धा अखेरीस माणूसच असतो, हे आपण विसरून जातो. नैराश्यावर विजय मिळवण्याचे अनेक सकारात्मक मार्ग आहेत. पण असे मार्ग मोहाच्या क्षणी नैराश्यग्रस्त व्यक्तीला समोर दिसणे, हेसुद्धा तितकेच आवश्यक आहे. एकाकीपणावर किंवा दु:खावर मात करण्यासाठी काही आरोग्यपूर्ण मार्ग असू शकतात, हे ‘रेव्ह पार्टी’ करणार्‍या युवकांच्या गावीही नव्हते, असे खेदाने म्हणावेसे वाटते. नैराश्यावर मात करण्यासाठी परिस्थितीशी मानसिकदृष्ट्या जुळवून घ्यायचे की निराशा दारूत बुडवायची?

काही वर्षांपूर्वीपर्यंत ड्रग्जसेवनाचे प्रमाण कमी झाले होते; पण गेल्या दीड वर्षात ते पुन्हा वाढले आहे. अमली पदार्थांच्या सेवनामागे एड्सचा मोठा धोका दडला आहे. क्षणिक मौजमजेची जबरदस्त किंमत व्यसनासक्त व्यक्ती आयुष्यभर मोजत राहते. व्यसनांची समस्या मानसिक त्रासापुरती मर्यादित नाही; तर संस्कृतीच्या रसातळाला जाण्याशी ती जोडलेली आहे.

-डॉ. अनिल अवचट.

टाईम्स ऑफ इंडियाचे संपादक हे वाचून थोडा बोध घेतील अशी (व्यर्थ) अपेक्षा आपण बाळगू. 🙂

Advertisements

4 Comments »

 1. TOI मधला लेख वाचून खूप लोक अवाक झालेत…पण मला त्यांचे कडून वेगळी अपेक्षा नाही !!

  Comment by Ajit — March 13, 2007 @ 12:14 pm | Reply

 2. […] Filed under: General — Manish @ 4:06 pm Wanted to write this as a comment to Article that Yogesh posted earlier – Baba’s article on the rave parties and addiction; but realized that it was becoming way too […]

  Pingback by Rave parties, drug abuse, addiction & all that... « Anil Awachat — March 16, 2007 @ 4:06 pm | Reply

 3. रेव्ह पार्टी बाबतीत मला सगळ्यात धक्का बसला तो त्या मुलांच्या पालकाच्या प्रतिक्रिया बघून. त्यानीच जर अशी फूस दिली मुलांना, तर मुले कशी काय विचार करणार? पालकांनी पण ह्याचा विचार करायला नको का? स्वातंत्र्य आणि स्वैराचार यातील फरक कळायला नको का? हक्क जसे कळतात तशी कर्तव्य पण कळावीत नाही का? मुलांना पण आणि पालकांना पण.

  Comment by तेजस — March 17, 2007 @ 7:49 pm | Reply

 4. दुर्दैवाने स्वातंत्र्य आणि स्वैराचार यातील फरक बहुतांशी लोकांना कळतच नाही.

  Comment by Manish — March 20, 2007 @ 3:02 pm | Reply


RSS feed for comments on this post. TrackBack URI

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s

Blog at WordPress.com.

%d bloggers like this: