Anil Awachat (अनिल अवचट)

March 3, 2007

माझा अनुभव… डॉ. अवचटांच्या कार्यक्रमाचां

Filed under: General — shripad @ 2:04 pm

पुण्यात “सकाळ’मध्ये सप्टेंबर 1999ला रुजू झालो. नगरचा श्रीपाद ब्रह्मे माझ्याच बॅचचा. मी मराठवाड्यातून तिथं गेलेलो आणि तो सुमारे एक-दीड वर्षापासून तिथंच राहणारा. मी राजकारणात, समाजाच्या प्रश्‍नात रमणारा. तो रमायचा साहित्यात. चांगलं साहित्य कोणतं, हे त्याला कळायचं. पु. ल. देशपांडेंनी त्याला पत्रही पाठवलेलं. त्यानं ते जपून ठेवलंय. मला त्यानं ते एकदा अभिमानानं दाखवलंही. त्याच्याकडूनच डॉ. अनिल अवचटांविषयी ऐकलं. त्यानं मला डॉक्‍टरांचं एक पुस्तक वाचायला दिलं. त्यापूर्वी माझी वाचनाची तयारी व्हावी, म्हणून एका दिवाळी अंकातला लेख दिला होता. त्यानंतर त्यानं पुस्तक पुढं केलं. मी ते घेतलं. रात्रीतून वाचलं. सकाळी त्या म्हणाले,””ही स्टाईल वेगळीचं. बाकीच्या पुस्तकात असं लिहिलेलं नसतं.” त्यावर त्यानं सांगितलं की, ही “रिपोर्ताझ’ पद्धत आहे. फक्त डॉक्‍टर अवचटंच तसं लिहितात. पहिल्या पुस्तकानंच मी डॉक्‍टरांच्या लिखाणाच्या प्रेमात पडलो. पुण्यात असताना त्यांच्या कार्यक्रमाला हजेरी लावण्याचा योग आला नव्हता. “सकाळ’च्या वर्धापनदिनाला डॉक्‍टर आले होते. ब्रह्मेनं माझी त्यांच्याशी ओळख करून दिली. मी आनंदलो. ज्यांचं काही तरी वाचलंय, अशा माणसाला पहिल्यांदाच भेटत होतो.
पुढं मे 1999 मध्ये “सकाळ’नं औरंगाबादेत आवृत्ती सुरू केली. ती मराठवाड्यासाठी. माझी बदली झाली. आपल्या भागात आल्याचा आनंद मला झालेला. मी औरंगाबादच्या ऑफिसात बातम्यांच्या संपादनाचं काम करू लागलो. पुढं सहा-आठ महिन्यांत मला बातमीदारीचं काम मिळालं. माणसांत वावरण्याचा छंद असल्यानं मी ते स्वीकारलं. अगदी आनंदानं.

उद्याच्या कार्यक्रमांचं नियोजन आधल्या दिवशी रात्री व्हायचं. जानेवारी 2001चे दिवसं. कदाचित दुसरा आठवडा असावा. डॉ. अनिल अवचटांचं व्याखान. त्याची पत्रिका ऑफिसात आलेली. कार्यक्रम वहीत लिहिल्याचं मी बघितलं. “मी या कार्यक्रमला जातो,’ असं मी रात्रीच सांगितलं. त्यामुळं कार्यक्रमासमोर माझं नाव लिहिलं. व्याख्यानाला मी जातोत, याचं काहींना आश्‍चर्यही वाटलं. कार्यक्रम संध्याकाळचा. काही दिवसांपूर्वीच्या अवकाळी पावसामुळं जरा थंडी होती. संध्याकाळी कार्यक्रम असल्यानं मी दुपारीच काही बातम्या देऊन टाकलेल्या. संध्याकाळचा ताण नको म्हणून. “इंडियन मेडिकल असोसिएशन’च्या हॉलमध्ये हा कार्यक्रम. बहुतेक पेपरचे बातमीदार तिथं आलेले. ते डॉक्‍टरांना ओळखत नसावेत. त्यांचं कामही त्यांना माहितं नव्हतं.

डॉक्‍टरांनी त्यांच्या आयुष्याची पानं तिथं उलगडली. अडीच-तीन तासांचं व्याख्यान, पण कंटाळा दिसत नव्हता कुणाच्याही चेहऱ्यावर. डॉक्‍टरांनी, ते कसे घडले. कसे वाढले. डॉक्‍टरकी सोडून समाजाच्या कामात कसे आले. पत्नीची साथ कशी मिळाली. काम पुढं कसं सरकलं… सारं काही सांगितलं.
आता त्यातून बातमी काम करावी, हा माझ्यासमोरचा प्रश्‍न. आज वेगळी बातमी लिहिता येणार, हे माझ्या मनात होतं. व्याख्यान संपलं. बाकीच्या पेपरचे बातमीदार निघून गेले घाईनं. मी थांबलो. डॉक्‍टरांना भेटावं. पुण्यातील भेटीची आठवण करून द्यावी, असं माझ्या मनात होतं. व्याख्यानानंतर श्रोते घराची वाट धरतात. संयोजक आणि व्याख्याते चहाला निघतात, असा माझा अनुभव होता, पण त्या दिवशी तसं काही घडलं नाही. डॉक्‍टरांच्या भोवती गराडा पडला. तरूण मुलांचा. बहुतेक सारी मेडिकलची होती. नेमकं काय चाललयं, हे पाहण्यासाठी मीही त्यांच्यात शिरलो. डॉक्‍टरांवर प्रश्‍न बरसत होते. “तुम्ही कसं काम करता,’ “आम्हाला जमलं का,’ “कशी सुरवात करावी,’ या प्रश्‍नांना डॉक्‍टर शांतपणे उत्तरं देत होती. मला हे प्रश्‍नोत्तरांचं सत्र क्‍लिक झालं. ठरवलं, “हीच बातमी.’ अडीच-तीन तासांच्या व्याख्यानानंतरचे हे 20-25 मिनिटांचे अनौपचारिक सत्र. मला बातमीची सुरवात देणारं.

मी ऑफिसात परतलो. काहीसा उत्साहानं. मग 15-20 मिनिटांत बातमी पूर्ण. प्रश्‍नोत्तरांचं सत्र माझ्या बातमीच्या लीडमध्ये. दोघा मित्रांना दाखवली. “वेगळी आहे. छान… चौकट करायचा निरोप लिही,’ असं त्यांनी सांगितलं. बातमी दिली. नंतरचं काम आटोपून घरी परतलो. दुसऱ्या दिवशीपासून लग्नाची रजा. त्यामुळं रात्रीच गावी (बीडला) गेलो. नंतर दोन-अडीच महिन्यांची रजा. बातमी कशी छापली, ते मला माहितं नव्हतं. सकाळीच मित्राला फोन केला. बातमीचं विचारलं. त्यानं चौकट केल्याचं सांगितलं. मग बर वाटलं. आल्यानंतर मात्र मला अंकाची प्रत मिळू शकली नाही. अंक संग्रही नाही, पण त्या कार्यक्रमाची आठवण मनात साठली. अपोआपचं. आजही “आयएमए हॉल’समोरून जाताना डॉक्‍टरांच्या कार्यक्रमाची आठवण ताजी होते…

Advertisements

4 Comments »

 1. Very nice Shripad!!! बातमी मिळाली असती तर फारच छान झाले असते!
  But I am really glad that many people are contributing with their expereince to the blog now…this is what I always wanted!!! Very happy that it is finally happening!!!! 🙂

  Comment by Manish — March 3, 2007 @ 3:50 pm | Reply

 2. khoopach sundar anubhav aahe 🙂

  Comment by yogesh — March 3, 2007 @ 9:19 pm | Reply

 3. वा ! श्रीपाद, अभिनंदन !!
  blog वर नेहमी ‘लिहिता’ रहा.

  Comment by Ajit — March 5, 2007 @ 10:56 am | Reply

 4. श्रीपाद, तुझा लेख फार आवडला. असेच नेहमी लिहीत रहा, आम्हाला वाचायला आवडेल.

  Comment by तेजस — March 17, 2007 @ 7:23 pm | Reply


RSS feed for comments on this post. TrackBack URI

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s

Create a free website or blog at WordPress.com.

%d bloggers like this: